लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्सच्या सहकार्याने सुमनालय फाउंडेशनने केला बाल मंदिर गुरुकुलात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा
पनवेल येथील बाल मंदिरात सुमनालय फाउंडेशन, मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स यांच्यातर्फे एक अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सन २००४ पासून वैदिकशिक्षणाबरोबरच बालमंदिर येथे गुरुकुल पद्धतीने इतर शैक्षणिक ज्ञान दिले जाते, सुमारे 80 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आधुनिक संस्कृतीशी वैदिक संस्कृतीचा समन्वय साधून विध्यार्थी इतरांच्या बरोबरीने राहतील अशा प्रकारे शिक्षण दिले जाते!
समाजसेविका कै. सुमन कृष्णकांत भानुसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१९ मधे गठीत करण्यात आलेल्या सुमनालय फाउंडेशन या सामाजिक संस्थेने लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स च्या साथीने येथील विद्यार्थ्यांना अन्नदान ,संगणक, पंखे आदि आवश्यक भेटवस्तू दिल्या. बालमंदिर गुरूकुलचे मुख्याध्यापक विष्णूप्रसाद गौतम यांना या भेटवस्तू सुपूर्दकरण्यात आल्या.
संस्थेला लवकरच संगणक शिक्षण, विशेष इंग्रजी वर्ग आणि वाणिज्यचे ज्ञान देण्याचे डॉ प्रताप मुदलियार, सुनिल मिश्रा यांनी आश्वासन दिले ! बालमंदिरातील विद्यार्थ्यांनी केलेला विष्णु सहस्रनाम, पनवेलचे नेत्रतज्ज्ञ डॉ.संतोष नायर, पार्वती वॉरियर यांचे आध्यात्मिक गीतांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. ममता संतोष नायर, डॉ. संतोष नायर, मोहन कलव्हेरे, परमेश्वरन, डॉ. रीना अग्रवाल आदी सर्व लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चे सक्रिय पदाधकारी,सदस्य तसेच सुमनालय फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ सुजाता वारियर , कोषाध्यक्ष रुद्रन, विवेक वॉरियर,*मेघा वालिया* डॉ रीना अग्रवाल आणि श्रीमती तलवार आदीचा प्रमुख सहभाग यात लाभला.
डॉ सुजाता वॉरियर यांनी सांगितले की, “ जग सुंदर असेल, जिथे प्रत्येक मुलाला योग्य वयात योग्य नैतिक संस्कार दिले जातील.बालमंदिर गुरुकुल हे खरे शिक्षण पद्धतीचे मॉडेल आहे”
” सध्याच्या समाजात, जिथे अशांतता, अराजकता आणि स्वार्थीपणा आहे, तिथे लहान मुलांनी आणि तरुणांनी नैतिक मूल्ये विकसित करणे आणि मानवतेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना प्रगत शिक्षण देणे काळाची गरज आहे.तरुणाई ही कौटुंबिक, समाज मुल्ये ओळखून समाजाला कुटुंब समजुन काम करेल तेव्हा तो खरा कुटुंब दिनाचा उत्सव असेल.” असे स्पष्ट मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.