‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार
कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी सिंधुरत्न कलावंत मंच सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.
११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोस्तवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन आयोजण्यात आले आहे. पुढील तीन दिवस १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.
सिंधूरत्न कलावंत मंच या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे कोकणातील कला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावा हा आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याही वर्षी ११ डिसेंबरपासून रत्नागिरी मधून या महोत्सवाची सुरुवात होत आहे. १६ डिसेंबरला मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हा भव्यदिव्य महोत्सव रंगणार आहे. कोकणात निसर्गसंपन्नतेसह उत्तोमोत्तम कलाकार-तंत्रज्ञ आहेत त्यांचे कलागुण जगासमोर यावे आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हाच संस्थेचा निर्मळ हेतू आहे. यासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत स्थानिक कलाकारांचे मनोबल वाढवतील. शिवाय संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवाला चारचाँद लावतील यात काही शंका नाही.
विशेष म्हणजे सिंधूरत्न कलावंत मंच संस्थेला महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी पत्ररुपी तर अभिषेक बच्चन यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून येथे आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसेच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील जेणेकरून तेथील चित्रपट संस्कृती वाढावी ही एकमेव भावना असल्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले. कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असून गेल्यावर्षीप्रमाणेच या ही वर्षी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत.
By T. Roy
मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!
मुंबई: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असताना चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी ‘छापा काटा’ चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे. मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे.
शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे यांनी उत्स्फूर्त संगीत दिले आहे. गौरव चाटी यांनी देवतांच्या भक्तीत सर्वांनी विलीन व्हावे असे स्वर या गीतास दिले आहेत. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. येत्या १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ या गोंधळगीताचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.
“आम्ही आमच्या मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सतत उत्साही ठेवण्याच्या दृष्टीने कार्यरत असतो. यावेळीही ‘छापा काटा’ या धमाल चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना कमाल गाणी अनुभवायला देत आहोत. आशा आहे की ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
*ट्रेलर पाहण्यासाठी CHHAPA KAATATRAILER*
https://drive.google.com/file/d/1X2dH2xNM1zvoBY_8De3eHjR2WeC_6Jxq/view?usp=sharing
*अधिक माहितीसाठी*
Facebook : https://www.facebook.com/UltraMarathi
Twitter : https://twitter.com/UltraMarathi
News Keyword
@MarathiSong
@AaiTujhyaNavaneGondhalMandla
@TheMovieChhapaKata
@UltraMusic
@UltraMusicMarathi
@UltraMediaandEntertainmentPvtLtd
@adarshshinde
@sunidhichauhan
@aryaambekar
@gauravchati
@abhayjodhpurkar
@shashankkondvilkar
@ganeshsurve
@marathimelody
@marathimusic
@marathiclasicmusic
@MakarandAnaspure
@TejaswiniLoniri
@VijayPatkar
@pankajvishnu
@15December2023ChhapaKaata
@SushilkumarAggarwal
@SandeepManoharNavare
By T. Roy
बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर
बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की !
चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर ‘झिम्मा २’ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय ‘झिम्मा २’ सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही ‘झिम्मा २’ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत ‘झिम्मा २’ स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.”
By T. Roy
“क्लब 52″‘चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच
हार्दिक जोशींची दमदार भूमिका
– चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता हार्दिक जोशीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून,
हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.
“क्लब 52” या चित्रपटाची एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन आहे. कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. चित्रपटात अॅक्शनची भरमार आहे, शिवाय संवादही खटकेबाज आहेत. काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचा दिसतो आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटानं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आता केवळ १५ डिसेंबरपर्यंत थांबावं लागणार आहे.
By T. Roy
‘महापरिनिर्वाण’ दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे, जी त्यांच्या शक्तिशाली कथाकथनाने मार्मिकपणे प्रेक्षकांना मोहित करत आहे. “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय.” असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या श्री नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत अभिनेता गौरव मोरेही दिसत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेला, दलितांच्या हक्कांसाठी लढलेला, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारा दूरदर्शी नेता आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखों लोकांनी शोक व्यक्त केला होता. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स व अभिता फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे आहे आणि निर्माते सुनील शेळके तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत. संगीतकार विजय गावंडे असून गुरु ठाकूर यांचे या चित्रपटाला गीत लाभले आहे. अमर कांबळे यांनी ‘महापरिनिर्वाण’चे छायाचित्रीकरण केले आहे. तसेच या चित्रपटाचे वेशभूषाकार चंद्रकांत सोनावणे आणि कलादिग्दर्शक नितेश नांदगांवकर आहेत.
By Sunder More
‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाचा शंभरावा प्रयोग
श्याम बेनेगल, गोविंद निहलानी आणि सचिन पिळगावकरांच्या प्रमुख उपस्थितीत रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगला प्रयोग
लेखन-दिग्दर्शनासोबतच विविध व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन करणारा रंगकर्मी संतोष पवारच्या ‘यदा कदाचित’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर विक्रमी घोडदौड केली होती. मागील काही दिवसांपासून संतोषच्या ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नुकताच या नाटकाने शंभर प्रयोगांचा टप्पा पार केला. या नाटकाने शंभराव्या प्रयोगाचे औचित्य साधत ऐतिहासिक कलाकृतींचे साक्षीदार असलेल्या रॉयल ऑपेरा हाऊस या वास्तूत सादरीकरणाचा मान पटकावला असून हा दिमाखदार सोहळा मराठी-हिंदी सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हाऊसफुल उपस्थितीत संपन्न झाला.
‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये व्हावा हे नाटकाच्या निर्मात्या मानसी केळकर आणि किरण केळकर यांचे स्वप्न होते. त्यानुसार रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी ‘यदा कदाचित रिटर्न्स’चा शंभरावा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादर करण्यात आला. या प्रयोगाला ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी, निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर, त्यांच्या मातोश्री सुनीला शरद पिळगावकर, भगिनी तृप्ती पिळगावकर, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेता संजय खापरे, अरुण कदम, पूर्णिमा अहिरे आदी कलाकार मंडळी उपस्थित होती.
यायाप्रसंगी बोलताना सचिन पिळगावकर यांनी संतोष पवार यांच्या लेखन-अभिनय कौशल्याचं तोंड भरून कौतुक केलं. ते म्हणाले की, संतोषची एनर्जी अफलातून आहे. हा सोहळा आहे, प्रयोग नाही. प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या वयात नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला याचं कौतुक वाटतं. आम्हा सर्व मराठी कलावंताकरीता खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी हे नाटक इथपर्यंत पोहोचवलं असून, तेच या नाटकाला पुढेही नेणार आहेत. किरण आणि मानसी केळकर यांनी या नाटकाची निर्मिती करण्याकरीता धैर्य दाखवलं आणि संतोषच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. संतोषचा ट्रॉफीवर तसेच पोस्टरवर फोटो येणे हे केवळ संतोषवरील प्रेमापोटी नसून, त्यामागे त्याची खूप मेहनत आहे. हे नाव संतोष तू कमावलेलं आहेस. हि तुझी कमाई आहे, जी कोणीही तुझ्याकडून चोरू शकत नाही. अडीच तास पूर्ण एनर्जीसह मनोरंजन करणं ही साधी गोष्ट नसल्याने सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो. १९९९पासून संतोषने ‘यदा कदाचित’द्वारे हा प्रवास सुरू केला आणि विविध रूपांमध्ये तो समोर आणला. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकातील मर्म कायम ठेवून संतोषने शेवटही तसाच केला आहे. नाटकाच्या शेवटी डोळ्यांत पाणी आणलंस त्यामुळे संतोष तुझं विशेष कौतुक करतो. तर संतोष माझा लाडका अभिनेता असल्याचं सांगत दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले की, आम्ही एकत्र खूप काम केलं आहे. मी त्याला प्रेमाने ‘पॉवर’ अशी हाक मारतो. कारण त्याच्याकडे अफाट पॉवर आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना संतोष म्हणाला की, हे नाटक कोरोनाच्या अगोदर रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा याचे १६७ प्रयोग झाले होते. तेव्हाचे निर्माते पुजारीही इथे आले आहेत. कोरोनामुळे नाटक थांबलं. त्यानंतर पुन्हा नाटक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मित्र निर्माता दत्ता घोसाळकर सोडून गेल्याने त्या चक्रात आम्ही सर्वजण अडकलो. कॉलेजचा मित्र किरण जेव्हा माझ्याकडे आला, तेव्हा मी नेमका स्लीप डिस्कने आजारी होतो. मी बेडवर होतो. तो रोज मला भेटायला यायचा. तालिमीलाही माझा बेड असायचा. झोपून तालीम केली, पण किरण हटत नव्हता. त्याने विश्वास दाखवल्याने हे नाटक करणं शक्य झालं. शंभर प्रयोग करताना खुप अडचणी आल्या, पण किरण आणि मानसीवहिनी यांच्या दृढ निश्चयाने आणि प्रेक्षकांच्या शाबासकीमुळे आज हे नाटक शंभराव्या प्रयोगापर्यंत पोहोचू शकल्याचे संतोष म्हणाला.
निर्मात्या मानसी केळकर आणि किरण केळकर यांनी ‘सोहम प्रोडक्शन्स’ आणि ‘भूमिका थिएटर्स’ या संस्थेच्या माध्यमातून ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. याचं लेखन-दिग्दर्शन संतोष पवारने केलं आहे.
By T. Roy
बॉडी बिल्डर ते अभिनेत्याचा प्रवास : रोहित परशुराम
“मुंबईत पहिला दिवसाची सुरवात ‘मन्नत’ वर केली”, रोहित परशुराम
प्रत्येक माणसाकडे काहींना काही गुणवत्ता असतातच आणि त्याचे ते गुण आणि कौशल्य त्याला सर्वांपेक्षा वेगळं बनवतात. काही लोक त्या गोष्टी शिकतात तर काहींच्या रक्तातच ते गुण असतात. मालिकांमध्ये आपण खूप परिपूर्ण किरदार पहिले असतील, पण खऱ्या आयुष्यात एक सर्वगुण संपन्न मुलगा कदाचित पहिला असेल. झी मराठीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुनची भूमिका निभावणारा रोहित परशुराम, तो सर्वगुण संपन्न मुलगा आहे ज्याच्या कलेचं कौतुक करू तितकं कमी. रोहितशी त्याच्या कलांबद्दल गप्पा मारताना कळले की अभिनेता होण्याच्या पलीकडे रोहितच्या आयुष्यात खूप काही घडले आहे. शाळेत असताना रोहित वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकवायचा, तिथून घडत गेला हा कलाकार, वक्तृत्व मध्ये अव्वल असल्यामुळे कॉलेज मध्ये सूत्रसंचालन करण्याची त्याला संधी मिळाली.
रोहितच्या फक्त जिभेवर सरस्वती विराजमान नाही तर त्याला बजरंगबलीचा आशिर्वाद ही आहे. २०१७ मध्ये रोहित मिस्टर इंडियाच्या स्पर्धेमध्ये खेळला. २००६ पासून रोहितने बॉडी बिल्डिंगच प्रशिक्षण सुरु केले आणि राष्ट्रीय स्तरावर खूप पारितोषिक ही पटकावले आहेत. त्यानंतर त्याने पुण्याला स्वतःची व्यायामशाळा सुरु केली. जवळ पास ६५० प्रशिक्षणार्थी होते जे त्याच्या हाता खाली प्रशिक्षण घेत होते. हे सर्व सांगताना रोहित म्हणाला मी अभिमानाने सांगू शकतो की मी एक चांगला आहार तज्ञ् आहे आणि आज ही मी काही लोकांना डाएट प्लॅन सांगोत. हे सर्व होतं असताना २०१८ ला माझ्या आयुष्यात एक नवीन वळण आले माझी भेट झाली माझ्या आतल्या कलाकाराची आणि तिथून सुरु झाला ऍक्टिंगचा प्रवास. मी विक्रम गोखले गुरुजींचा विध्यार्थी आहे. त्यांच्या कडून ह्या कलेचा अभ्यास केला आणि स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईला आलो. मुंबईला आल्यावर सर्वात पहिले शाहरुख खानच्या ‘मन्नत’ वर गेलो आणि ऍक्टिंग करियरची सुरवात केली. मी शाहरुख खानचा खूप मोठा प्रशंसक आहे.
मला ते कलाकार आणि एक उत्तम माणूस म्हणून खूप आवडतात. आपल्या परिवारावर इतका प्रेम करतातं त्यांची ती बाजूही मला खूप आवडते. नुकतेच झी मराठी अवॉर्ड्स होऊन गेले आणि ज्या दिवशी अवॉर्ड्स झाले त्या दिवशीही मी वांद्राला मन्नतवर जाऊन आलो. मला आत्मविश्वास आहे की मी कधी न कधी त्यांच्या सोबत असणार. मला आवर्जून सांगावस वाटतंय की लहानपणी डान्स कॉम्पिटिशन मध्ये मी शाहरुख खानच्या गाण्यांवर नाचून पारितोषिक मिळवले आहे. सोशल मीडियावर रोहितच्या घरगुती कला ही खूप दिसून येतात त्याच्या मागे जी व्यक्ती आहे ती म्हणजे रोहितची अर्धांगिनी. रोहितच म्हणणं आहे की माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याची शिल्पकार माझी बायको पूजा आहे. मी पाककला कोल्हापूरच्या तालमीत होतो तेव्हा शिकलो पण पुरणपोळी मला पूजाने शिकवली. वडिलांचे हॉटेल असल्यामुळे सणावाराला मी तिथे रांगोळी काढायचो. मी परमेश्वराचे खूप आभार मानतो की त्यांनी मला क्षमता दिली आहे की मी लवकर गोष्टी बघून शिकतो.
मी शेवटी इतकंच सांगेन जितकं प्रेम तुम्ही अर्जुन आणि आमच्या मालिकेवर करता तसेच करत राहा आणि सोमवार ते शनिवार संध्या ६:३० वाजता बघायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ तुमच्या लाडक्या झी मराठीवर.
By T. Roy
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. शरद पवार व मुख्य निमंत्रक मा.ना.श्री. उदय सामंत आहेत.
तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.
शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.
दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे येथे संपन्न होणार असून दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगर, दिनांक २७ आणि २८ जानेवारी २०२४ सोलापूर, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ बीड, दिनांक १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ लातूर, दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर, आणि मुंबई येथे नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा , मुंबई येथे संपन्न होणार आहे.
एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय व तृतीय एकांकिका आणि बालनाट्यसाठी अनुक्रमे रु. ११,०००/- रु. ७,०००/- व रु. ५,०००/- पारितोषिक देण्यात येणार असून अंतिम फेरीत या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस रु. २,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे अथवा इतर एकांकिकेस प्रथम रु. १,००,०००/-, द्वितीय रु. ७५,०००/- तृतीय रु. ५०,०००/- आणि उत्तेजनार्थ २५,०००/- रोख, तसेच दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय ह्या साठी प्रत्येकी प्रथम द्वितीय व तृतीय साठी अनुक्रमे रू. १५,०००/-, रू. १०,०००/-, रू. ५,०००/- रोख देण्यात येणार आहेत. या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास ह्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.
अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ५०,०००/- ,रू. ३५,०००/- , रू. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार आहेत.
सर्व सहभागी कलावंतांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.
या संपूर्ण १०० व्या नाट्य संमेलनास रसिक आणि रंगकर्मींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.
By T. Roy
`स्टोरीटेल`ची सहा वर्षे!
जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता विशेष आहे. सातव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा संवाद.
प्रश्न- `स्टोरीटेल`चे भारतात सातव्या वर्षात पदार्पण झाले आहे. मागे वळून पाहता, काय वाटते?
उत्तर- २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आम्ही भारतात दाखल झालो तेव्हा आमच्याकडे भारतीय भाषांतील अगदी कमी पुस्तके होती. तसेच तेव्हा वर्गणी भरुन पुस्तक ऐकणे, ही संकल्पनाच आपल्याकडे तशी नवी होती. मात्र, आमच्यावर विश्वास ठेऊन पुस्तकांवर प्रेम करणारे लाखो वाचक श्रोते म्हणून आमच्याशी जोडले गेले. दरवर्षी आमच्याकडील पुस्तकांच्या संग्रहात मोठी वाढ होत गेली, तसतसा प्रतिसादही वाढत गेला. स्टोरीटेलच्या निमित्ताने भारतातील ऑडिओ बुक इंडस्ट्रीदेखील आकारास येत गेली. त्यातून विविध प्लॅटफॉर्मही आकारास आले आणि आजतागायत सुमारे दहा लाखांहून अधिक रसिक या माध्यमाशी संलग्न झाले. मला वाटते, भारतात श्राव्य पुस्तकांचे स्टेबल मार्केट आज दिसते आहे, त्यात `स्टोरीटेल` मोठी भूमिका बजाऊ शकले, याचा मला विशेष आनंद आहे.
प्रश्न- स्टोरीटेल सुरु झाले तेव्हाचे मुख्य आव्हान कुठले होते आणि त्यावर तुम्ही मात कशी केली?
उत्तर- स्टोरीटेलची सुरवात झाली तेव्हा आपल्याकडे पुस्तके ऐकण्याची, विशेषतः पैसे भरुन ऐकण्याची सवय नव्हती. त्यामुळे वर्गणीदार वाचक-श्रोता तयार करणे हे मुख्य आव्हान होते. सुदैवाने आमच्याकडील सर्वोत्तम असा पुस्तकसंग्रह, युजर एक्सपेरिन्स यामुळे सशुल्क ऐकणाऱ्यांचा वर्ग आम्ही तयार करु शकलो. याशिवाय, आम्ही अनेक प्रकाशकांनाही त्यांची पुस्तके स्टोरीटेलवर आणण्याची संधी दिली. त्याचाही फायदा झाला. आम्ही तरुणाईला कनेक्ट करु शकलो. आज, आमच्याकडे केवळ मराठीपुरते बोलायचे झाले तरी तब्बल ५००० हून अधिक पुस्तके आहेत. आमची शेकडो ओरिजनल्स, तसेच पॉडकास्ट लोकप्रिय आहेत. स्टोरीटेल कट्टा हा आमचा पॉडकास्ट मराठीत सर्वाधिक ऐकला जाणारा पॉडकास्ट असून त्याचे ३०० भाग प्रसारित झाले आहेत. सहाशेहून अधिक पब्लिशर्स, लेखक, नॅरेटर्स असा आमचा परिवार बहरला आहे. २७ नोव्हेंबर रोजी आम्ही लोकप्रिय लेखक सुहास शिरवाळकर यांचे अस्तित्व ही कादंबरी मुद्रित स्वरुपात येण्याआधी आम्ही श्राव्य स्वरुपात प्रकाशित करतो आहोत, हे यानिमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते.
प्रश्न- स्टोरीटेलची आगामी वाटचाल कशी असेल?
उत्तर- मागच्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाले, तेव्हापासून `स्टोरीटेल`चे जागतिक प्राधान्यक्रम बदलले आहेत. त्यामुळे अन्य देशांपेक्षा युरोपकेंद्री धोरण सध्या अवलंबण्यात आले आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही पूर्वीसारखी गुंतवणूक करु शकलो नाही. मात्र, भविष्यात धोरण बदलताच ही परिस्थिती बदलू शकते. त्याबाबतीत आम्ही सकारात्मक आहोत.
By T. Roy
मराठी संगीतविश्वात ‘बीग हिट मीडिया’चं दणक्यात पदार्पण, लवकरचं येणारं ‘आला बैलगाडा’ गाणं
आजकाल मराठी संगीतसृष्टी चांगल्या पद्धतीने अग्रेसर होत आहे. सोशल मीडियावर विविध धाटणीची गाणी आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात. सिनेसृष्टी सोबतच संगीतसृष्टीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रतिसादाला पाहून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक नवीन मराठी म्युझिक रेकॉर्ड लेबल ज्याचं नाव आहे ‘बीग हिट मीडिया’. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट या दोघांनी मिळून या रेकॉर्ड लेबलची निर्मिती केली आहे. शिवाय या रेकॉर्ड लेबलचं पहिलं वहिलं भव्य दिव्य ‘आला बैलगाडा’ हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुत्रांच्यानुसार, हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलं असून प्रशांत नाकती यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
निर्माता हृतिक अनिल मनी त्याच्या नव्या म्युझिक रेकॉर्ड लेबलविषयी सांगतो, “आमची ही तिसरी पीढी आहे जी सिनेसृष्टीत काम करत आहे. माझे आजोबा सी एल. मनी हे क्रेएटिव्ह आर्टीस्ट होते त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सिनेमांचे पोस्टर डिझाईन केलेत. आत्तापर्यंत आम्ही ४००० सिनेमांची पब्लिसीटी आणि प्रमोशनची काम केली आहेत. सिनेमा आणि गाण्यांवर माझं नितांत प्रेम आहे. त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण अनुष्का अविनाश सोलवट हीने ‘बीग हिट मीडिया’ची निर्मीती केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती तसेच आपल्या मातीतलं मराठमोळं लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबलमार्फत प्रदर्शित करणार आहोत. तुमचं प्रेम आमच्यासोबत असावं हिचं सदिच्छा !!”
निर्माती अनुष्का अविनाश सोलवट ‘बीग हिट मीडिया’विषयी सांगते, “मनोरंजन क्षेत्रात मी नवीन आहे. परंतु म्युझिक क्षेत्रात काम करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात विविध संस्कृती आहेत. मला खात्री आहे की ‘बिग हिट मीडिया’ रेकॉर्ड लेबल नक्कीच आपलं लोकसंगीत, आपली परंपरा जगभर पोहोचवेल. ‘आला बैलगाडा’ या गाण्याने आम्ही शुभारंभ करत आहोत. तुमच असंच प्रेम आमच्यासोबत राहू देत.”
संगीतकार प्रशांत नाकती ‘बीग हिट मीडिया’च्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, “नविन रेकॉर्ड लेबल सुरू करण्याआधी निर्माता हृतिक अनिल मनी आणि निर्माती अनुष्का अविनाश सोलवट या दोघांनी खूप रिसर्च केलं. खूप महिने दोघांनी गाण्यांचा विषय काय असेल यावर काम केलं. अनेक गाण्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून ‘बीग हिट मीडिया’ची निर्मीती केली. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती गाण्यामार्फत लोकांपर्यंत पोहचावी म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ‘आला बैलगाडा’ या गाण्यावर काम करायला सुरूवात केली. गाण्याची खासियत सांगायची झाली. तर, या गाण्यासाठी लाईव्ह बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रमच आयोजित करण्यात आला होता. ‘बीग हिट मीडिया’च्या संपूर्ण टीमने या गाण्यासाठी अत्यंत मेहनत केली आहे. शिवाय लवकरचं हे गाणं तुमच्या भेटीला येईल.”
By T. Roy