‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची टीम बाप्पाच्या चरणी
लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन *२४ नोव्हेंबरला ‘एकदा येऊन तर बघा*’ हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. लालबाग, परळ परिसरातील बाप्पाचे दर्शन घेत या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनला धडाक्यात सुरुवात केली आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव, वनिता खरात, अभिनेता प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, रोहित माने चित्रपटातील ही मंडळी यावेळी उपस्थित होती.
By Sunder M