धी य. गो. गं. फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक संच वाटप
वटपौर्णिमेच्या शुभयोगावर १३२ वर्षांची वैभवशाली परंपरा असणार्या *धी य. गो. गं. फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे* यशोमंगल सभागृहात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या महाराष्ट्रातील विदुषी कांचन जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते ८० गरजू विद्यार्थ्यी व विद्यार्थिनींना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय पुस्तकांचा संच देणगीस्वरूप म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमास ट्रस्टच्या सन्माननीय विश्वस्त उज्ज्वला मेहेंदळे, प्रमुख गुरूजी गजानन केळकर, पत्रकार शीतल करदेकर, चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी शिंदे , त्यांचे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी व पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक,यूट्यूब आणि स्थानिक केबलद्वारे करण्यात आले.या कार्यक्रमाची संकल्पना,संयोजन निवेदन ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत म. जोशी यांचे होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि गणेशभक्तांच्या तुडुंब गर्दीत हा कार्यक्रम साजरा झाला.